धानोरी : लोहगाव रस्त्यावरील कलवड परिसरातील दर्ग्याजवळ एका पुरूषाचा हाडांचा सापळा बुधवारी मिळून आला आहे. हवाई दलाच्या अधिकार्यांनी विमानतळ पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. कलवड येथील दर्गा जवळील नाला परिसर हवाई दलाच्या हद्दीत येत असल्याने संपर्क अधिकारी प्रशांत श्रीवास्तव यांनी विमानतळ पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलिस घटनेस्थळी येऊन नाल्यातील सापळा बाहेर काढून पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात शवविच्छेदन करण्याासाठी पाठविण्यात आला आहे. मंगळवारी आणि बुधवारी लोहगाव परिसरात जास्त पाऊस झाल्याने पाण्याच्या प्रवाहाने नाल्यातील सापळा वर आल्यामुळे अधिकार्यांना दिसला. मात्र या व्यक्तीचा बर्याच महिन्यापूर्वी मृत्यू किंवा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. गुरूवारी रात्री पर्यत या व्यक्तीची ओळख पडली नाही. शवविच्छेदनेचा अहवाल आल्यावर सत्य पुढे येईल, असे विमानतळ पोलिसांनी सांगितले.
Fans
Followers